Homeताज्या बातम्याशिरपूर तालुका पोलीस ठाणे, सांगवी येथील विविध कामांचे लोकार्पण ...

शिरपूर तालुका पोलीस ठाणे, सांगवी येथील विविध कामांचे लोकार्पण पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते संपन्न

शिरपूर तालुका पोलीस स्टेशन, सांगवी येथील कार्यालयीन विस्तारीकरण, बीट रूम, अधिकारी कक्ष व बहुउद्देशीय हॉल या नव्या सुविधांचे लोकार्पण राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले.

या सोहळ्यास माजी शालेय शिक्षण व क्रीडामंत्री आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी, तहसीलदार महेंद्र माळी, गटविकास अधिकारी प्रदीप पवार, जि.प.चे माजी अध्यक्ष तुषार रंधे, माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्यासह विविध मान्यवर, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासी वसाहतीसाठी प्रयत्न करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. “स्वंयसेवी संस्थांच्या मदतीने उभारलेला हा विकास उपक्रम जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांसाठी मार्गदर्शक ठरेल”, असेही त्यांनी नमूद केले.

आमदार अमरीशभाई पटेल यांनी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले. “मागील दहा वर्षांत अनेक अधिकारी येथे आले-गेले, मात्र हिरे यांनी सामाजिक भावनेतून व्यापक विचार करून सुंदर वास्तू उभारली आहे”, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

पोलीस निरीक्षक हिरे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, विस्तारीकरणासाठी सांगवी ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून दिल्याने अडचण दूर झाली. विविध संस्थांचे सहकार्य, मान्यवरांचे मार्गदर्शन व नागरिकांचा सहभाग यामुळे हे कार्य शक्य झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी आदिवासी परंपरेनुसार मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर विविध कक्षांचे लोकार्पण झाले. यावेळी पोलीस स्टेशनला मदत करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा तसेच शिरपूर टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत निकवाडे यांनी केले तर आभारप्रदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांनी केले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बेवारस वाहनांवर वाहतूक पोलिसांची कारवाई

पुणे : पुणे वाहतूक पोलिसांनी रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या आणि बराच वेळ दुर्लक्षित ठेवलेल्या वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी अशा वाहनांच्या...

शेजाऱ्याच्या अडीच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कामगार अटकेत

पुणे : शेजाऱ्याच्या अडीच वर्षांच्या मुलीला आंब्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून काळेवाडी पोलिसांनी मंगळवारी दुपारी ४७ वर्षीय कामगाराला अटक...

1 मार्चपासून राज्यात उष्माघाताचे 15 रुग्ण

पुणे: वाढत्या कमाल तापमानामुळे महाराष्ट्रात 1 मार्च ते 13 एप्रिल दरम्यान उष्माघाताची 15 प्रकरणे समोर आली असून, डॉक्टर आणि रहिवासी चिंतेत आहेत.राज्याच्या आरोग्य विभागाच्या...

एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठण्यासाठी पुण्याच्या तंत्रज्ञने अपंगत्वावर मात केली

देशमुख यांनी सहा वेगळ्या दिव्यांग ट्रेकर्ससोबत प्रवास केला पुणे: शारीरिक मर्यादा आणि क्रूर हवामानाला झुगारून, शहर-आधारित आयटी व्यावसायिक, समीर देशमुख यांनी 14 एप्रिल...

पहिल्या सीबीएसई इयत्ता दहावीच्या दुहेरी परीक्षेत, उत्तीर्णतेचा दर 93.7% पर्यंत वाढला; पुण्याच्या विद्यार्थ्यांनी जोरदार...

पुणे/मुंबई: बुधवारी जाहीर झालेल्या CBSE इयत्ता दहावीच्या निकालांमध्ये राष्ट्रीय उत्तीर्णतेच्या टक्केवारीत किरकोळ वाढ होऊन 93.7% झाली, परंतु पुणे विभागाची भक्कम कामगिरी आणि...

error: Content is protected !!