Homeमहत्त्वाचेतपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 25...

तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 25 एप्रिल रोजी उद्घाटन

शिरपूर : एस.व्ही.के.एम. संचालित तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलचे उदघाटन मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 25 एप्रिल 2026 रोजी करण्यात येत आहे.

श्री विलेपार्ले केळवणी मंडळ मार्फत संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या दूरदृष्टीने सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी एस.व्ही.के.एम. संचलित तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज व संशोधन केंद्र, खर्दे बु. ता. शिरपूर जि. धुळे येथे १२०० बेड च्या या अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी व सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे उदघाटन मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 25 एप्रिल 2026 रोजी करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येत असून यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री ना. जयकुमार रावल, मंत्री संजय सावकारे तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आमदार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री विलेपार्ले केळवणी मंडळाचे अध्यक्ष व एन.एम.आय.एम.एस. अभिमत विद्यापीठाचे कुलपती माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम दादा पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांनी केले आहे.

शिरपूर शहरातील अरुणावती नदी काठावरील शनी मंदिर परिसरात खर्दे बुद्रुक शिवारात या हॉस्पिटलचे काम सुरू आहे. या हॉस्पिटल मार्फत रुग्णांना अतिशय चांगल्या, अत्याधुनिक आरोग्य सेवा सुविधा देण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात ३५० बेडचे हॉस्पिटल सुरू करण्यात येत आहे.अनेक प्रकारच्या आजार व रोगांवर या हॉस्पिटलमध्ये उपचार केले जाणार असल्याने व देशभरातील नामांकित डॉक्टर्स मार्फत उपचार मिळणार असून जटील शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे दि. 25 एप्रिल 2026 शनिवार रोजी दुपारी 3 वाजता शिरपूर विमानतळावर आगमन होईल. येथे स्वागत झाल्यानंतर एस.व्ही.के.एम. इंजिनिअरींग कॉलेजचे दुपारी 3.25 वाजता उद्घाटन व पाहणी, दुपारी 3.48 वाजता कृष्णा कोटेक्स (वर्ल्ड क्लास) व डाय हाऊस आगमन, उद्घाटन व पाहणी, दुपारी 4.21 वाजता प्रथ टेक्सटाईल व एसेरोला येथे आगमन व उद्घाटन (एकाच ठिकाणी) व पाहणी, त्यानंतर संध्याकाळी 4.56 वाजता नर्सिग कॉलेज, खर्दे येथे उदघाटन होईल.यानंतर स्व. तपनभाई पटेल मेमोरीयल हॉस्पीटल (खर्दे) उदघाटन सोहळा संध्याकाळी 5.08 वाजता होऊन पाहणी करतील. यानंतर आर.सी.पटेल फॉर्मसी कॉलेज ग्राऊंड, शिरपूर येथे संध्याकाळी 7 वाजता जाहीर कार्यक्रम होईल.या ठिकाणी स्टेजवरुन वर्च्युअल (सुदूर यंत्रणेद्वारे ॲग्रीकल्चर कॉलेज व फॉर्मसी कॉलेज तरडी, आर.सी.पटेल इंग्लिश मेडियम स्कूल, निमझरी नाका शिरपूर चे उदघाटन होईल.तसेच स्टेजवरुन वर्च्युअल (सुदूर यंत्रणेद्वारे) भूमिपूजन समारंभ होईल. देवमोगरा माता मंदिर, नटवाडे, इंटरनॅशनल मोटर ड्रायव्हींग स्कूल, दहिवद येथील भूमिपूजन होणार आहे. त्यानंतर जनकव्हिला, शिरपूर येथे मुक्काम करण्यात येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जयंत पाटील यांच्या पुतण्याने एनसीपी (एसपी) सोडण्याचे संकेत दिले, म्हणतात की आजच्या राजकारणात निष्ठा...

पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुतणे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लवकरच पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत...

पत्नीने जीवन संपवल्यानंतर तांत्रिकाविरुद्ध एफआयआर

पुणे : वाघोली येथील त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने वाघोली पोलिसांनी एका तांत्रिकाविरुद्ध (३९)...

एअरपोर्ट रनवे बंद झाल्यानंतर पुन्हा वेळापत्रक, परतावा मिळवण्यासाठी प्रवासी धावपळ करतात

पुणे: शुक्रवारी रात्री सुखोई ३० एमकेआय फायटर जेटच्या हार्ड लँडिंगमुळे 99 उड्डाणे रद्द करणे आणि 12 येणारी विमाने पुणे विमानतळावर वळवणे यामुळे हजारो प्रवासी...

झेडपी शाळेच्या बांधकामाच्या ठिकाणी 12 वर्षांचा मुलगा काम करताना आढळला

पुणे: शिरूर तालुक्यातील वाडेगाव येथील जिल्हा परिषद (जि.प.) शाळेतील शौचालय आणि शौचालयाच्या बांधकामात गुंतलेल्या १२ वर्षीय मुलाची शुक्रवारी दुपारी लोणी कंद पोलिसांनी...

IAF लढाऊ विमानाच्या ‘हार्ड लँडिंग’मुळे पुण्याची धावपट्टी बंद, रात्रीच्या उड्डाणांवर परिणाम

पुणे: भारतीय हवाई दलाच्या (IAF) विमानाचा समावेश असलेल्या एका घटनेनंतर त्याची धावपट्टी लँडिंग आणि टेक-ऑफसाठी बंद करण्यात आल्याने शुक्रवारी रात्री 11 च्या...

error: Content is protected !!