Homeताज्या बातम्याधुळे पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला तरुणाचा जीव: कर्तव्यदक्षतेचे उत्तम उदाहरण

धुळे पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला तरुणाचा जीव: कर्तव्यदक्षतेचे उत्तम उदाहरण

धुळे जिल्हा पोलीस दलाच्या कर्तव्यदक्षतेचे एक उत्तम उदाहरण काल रात्री समोर आले. घरगुती वादातून आत्महत्येचा प्रयत्न करण्यासाठी निघालेल्या एका तरुणाचा जीव, पोलिसांच्या तत्पर आणि संवेदनशील कामगिरीमुळे वाचला. या घटनेमुळे धुळे जिल्हा पोलीस दलावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आमीन पिंजारी नावाच्या तरुणाचा रात्री उशिरा त्याच्या वडिलांसोबत किरकोळ वाद झाला. या वादातून तो रागाच्या भरात आत्महत्या करतो असे सांगून घरातून निघून गेला. काही वेळाने आमीनच्या वडिलांनी त्याला फोन केला असता, तो शिरपूर येथील तापी नदीकडे निघाल्याचे समजले. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी तात्काळ मित्र पोलीस हवालदार अविनाश प्रभाकर चंद्रा (नेमणूक: पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे) यांना रात्री ११.१५ वाजता संपर्क साधला.पोलीस हवालदार चंद्रा यांनी क्षणाचाही विलंब न करता नरडाणा पोलीस स्टेशन येथील त्यांचे मित्र पोलीस हवालदार राकेश शिरसाठ (ब.नं. ५११) यांना घटनेची माहिती दिली. पोलीस हवालदार शिरसाठ यांनीही तत्परता दाखवत रात्र गस्तीवर असलेले नरडाणा पोलीस स्टेशन येथील सहायक पोलीस उपनिरीक्षक सोनवणे आणि पोलीस हवालदार गवळी (ब.नं. ८८७) यांना या घटनेची माहिती दिली.या दोन्ही कर्तव्यावरील अंमलदारांनी तात्काळ शिरपूर येथील तापी पुलाकडे धाव घेतली. त्यांनी त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावून ये-जा करणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी सुरू केली. अवघ्या १० मिनिटांतच वर्णन केलेल्या वाहनाने आमीन पिंजारी हा तापीकडे जाताना त्यांना आढळला. त्यांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले आणि नरडाणा पोलीस स्टेशनला आणले.काही वेळातच आमीनचे कुटुंबीय नरडाणा पोलीस स्टेशनला पोहोचले. पोलिसांनी आमीनची योग्य प्रकारे समजूत घालून त्याला त्याच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले.या घटनेमुळे एका तरुणाचा जीव वाचला, ज्याच्या मागे वृद्ध आई-वडील, दोन भाऊ, एक अविवाहित बहीण, ८ वर्षांचा मुलगा, २ वर्षांची मुलगी आणि पत्नी असा मोठा परिवार आहे. धुळे जिल्हा पोलीस दलाच्या या संवेदनशील आणि तत्पर कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत असून, पिंजारी कुटुंबाने पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. पोलीस हवालदार अविनाश प्रभाकर चंद्रा, पोलीस हवालदार राकेश शिरसाठ, सहायक पोलीस उपनिरीक्षक सोनवणे आणि पोलीस हवालदार गवळी यांनी दाखवलेल्या कर्तव्यनिष्ठेमुळे जिल्ह्याच्या पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ट्रॅव्हल एजंटने 1.7L च्या प्रायव्हेट फर्मच्या कर्मचाऱ्याची फसवणूक केली

पुणे : भोसरी एमआयडीसी पोलीस अशा ट्रॅव्हल एजंटचा शोध घेत आहेत, ज्याने खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून ७ मे रोजी लंडनला जाण्यासाठी तीन विमान...

सुधा मूर्ती यांना डीलिट मिळणार आहे

पुणे: राज्यसभा खासदार सुधा मूर्ती यांना भारती विद्यापीठाच्या (विद्यापीठ मानल्या गेलेल्या) २७ व्या दीक्षांत समारंभात गुरुवारी आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)...

MACT ने दाव्यासाठी ‘वाहन लावणी’ला झेंडा दाखवला, पुणे ग्रामीण एसपींना पोलीस, वाहन मालक यांच्यावर...

पुणे: पुण्यातील मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने (MACT) एका जीवघेण्या अपघाताच्या दाव्यात मोटारसायकलची "लावणी" केली आहे आणि दावा फेटाळून लावताना, अशा कृत्यासाठी पोलिस कर्मचारी आणि...

अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना 30 लाखांची मदत

पुणे: मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने (MACT) टेम्पोचा चालक, मालक आणि विमा कंपनीला 9 मे 2017 रोजी मोटारसायकलला धडक दिल्याने मरण पावलेल्या व्यक्तीच्या...

प्रायव्हेट अकादमीच्या अधिकाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

पुणे : हडपसर येथील हांडेवाडी येथील एका खासगी प्रशिक्षण अकादमीच्या अधिकाऱ्यांवर शनिवारी 10 नोव्हेंबर 2025 रोजी वसतिगृहाच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत सापडलेल्या बीड येथील 16...

error: Content is protected !!