Homeक्राईमधुळ्यातील दारुबंदी खात्यात महिला कर्मचाऱ्याचा छळ? मुंबई आयुक्तांकडे थेट तक्रार; चौकशी सुरू**

धुळ्यातील दारुबंदी खात्यात महिला कर्मचाऱ्याचा छळ? मुंबई आयुक्तांकडे थेट तक्रार; चौकशी सुरू**

धुळे (प्रतिनिधी):
राज्य उत्पादन शुल्क विभागातील एका महिला कर्मचाऱ्याने सहकाऱ्यांकडून होत असलेल्या कथित शारीरिक व मानसिक छळाविरोधात थेट मुंबई येथील आयुक्तांकडे तक्रार केल्याने धुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, गेल्या चार महिन्यांपासून काही सहकारी कर्मचारी तिच्यावर अश्लील शेरेबाजी, अंगलट येणे आणि विनयभंगासारखे प्रकार करत आहेत. विशेष म्हणजे, हे प्रकार उघडपणे होत असल्याचा आरोप तिने केला असून, संबंधित घटनांचे काही व्हिडिओ पुरावेही तिने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याचे सांगितले आहे.
पीडित महिला एकल माता असून, कारवाईच्या ठिकाणी जाताना काही कर्मचारी मुद्दाम शारीरिक स्पर्श करतात, अपमानास्पद भाषा वापरतात, तसेच तिला कनिष्ठ दर्जाची कामे करण्यास सांगून मानसिक छळ करतात, असेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकारात एका महिला कर्मचाऱ्याचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या सर्व प्रकाराबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने, अखेर पीडितेने थेट मंत्रालयातील आयुक्तांकडे धाव घेतली. या तक्रारीची दखल घेत अशासकीय सदस्यांच्या माध्यमातून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, ज्यांच्यावर आरोप आहेत त्यापैकी एक कर्मचारी लवकरच सेवानिवृत्त होणार असल्याने, चौकशी लवकर पूर्ण करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीडित महिलेने केली आहे.
या प्रकरणाबाबत दारुबंदी विभागाच्या अधिक्षक स्वाती काकडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांचा भ्रमणध्वनी प्रतिसाद देऊ शकला नाही. त्यामुळे अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हिंजवडी फेज II मध्ये एप्रिल अखेरपर्यंत वाहतूक विस्कळीत

पुणे: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (MSETCL) द्वारे सुरू असलेल्या केबल दुरुस्तीच्या कामामुळे हिंजवडी फेज II मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुढील काही आठवड्यांत...

ज्येष्ठ नागरिक मालमत्ता कर सवलत संदेश खोटा: PMC

पुणे : पुणे महानगरपालिका (पीएमसी) वृद्धांना मालमत्ता करात ३० टक्के सवलत देत असल्याच्या सोशल मीडियावर फिरणाऱ्या मेसेजवर त्यांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन नागरी...

पाराच्या विषारीपणाशी संबंधित हर्बल पावडरमुळे पुण्यातील 9 वर्षांच्या मुलीमध्ये दुर्मिळ ब्रेन सिंड्रोम होतो.

पुणे: चेहऱ्यावरील पांढऱ्या ठिपक्यासाठी घेतलेल्या हर्बल पावडरमध्ये उच्च पातळीचा पारा असल्याचे डॉक्टरांना आढळून आले आहे, ज्यामुळे शहरातील एका नऊ वर्षांच्या मुलीला उच्च रक्तदाब आणि...

फॉरेस्ट पॅच डंपिंग ग्राउंड बनवतात, पर्यावरण आणि आगीची चिंता वाढवतात

पुणे: पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील जंगलांच्या कप्प्यांमध्ये अनियंत्रित कचरा टाकणे ही गंभीर पर्यावरणीय चिंता म्हणून पुढे येत आहे, ज्यामुळे वन्यजीव धोक्यात येत...

फोन का नाही केला? या किरकोळ कारणावरून पत्नीचा खून; शिरपूर तालुक्यात संतापजनक घटना

  शिरपूर (धुळे) | दि. 19 एप्रिल 2026 “ शिरपूर तालुक्यातील खैरकुटी गावात घडलेली घटना फोन का केला नाही?” या क्षुल्लक कारणावरून संतापाच्या भरात पतीने पत्नीचा...

error: Content is protected !!