Homeक्राईमनरडाणा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी : BlaBlaCarच्या माध्यमातून लुटमार करणारे दोन आरोपी...

नरडाणा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी : BlaBlaCarच्या माध्यमातून लुटमार करणारे दोन आरोपी जेरबंद

शिरपुर नरडाणा, ता. शिंदखेडा : मुंबई-आग्रा महामार्गावर मध्यरात्री घडलेल्या थरारक घटनेत नरडाणा पोलीसांनी तत्पर कारवाई करत BlaBlaCar अॅपच्या माध्यमातून कारमध्ये लिफ्ट घेऊन चालकाची लूट करणाऱ्या दोन आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे.

दि. ११ एप्रिल २०२६ रोजी रात्री १२:४३ वाजता डायल ११२ वर राहुल सपकाळ (रा. नरडाणा) यांनी कॉल करून एका लाल रंगाच्या वोक्सवेगन पोलो कारमध्ये एका व्यक्तीस तिघेजण मारहाण करत असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पोलीस येत असल्याचे लक्षात येताच आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.जखमी अवस्थेत सापडलेल्या तनुष राजेश तोमर (वय २६, रा. भोपाल) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी BlaBlaCar अॅपवरून नवी मुंबई ते भोपाल प्रवासासाठी तीन अनोळखी व्यक्तींना लिफ्ट दिली होती. नाशिक येथून कारमध्ये बसलेल्या आरोपींपैकी एकाने प्रवासादरम्यान उलटीचा बहाणा करून कार थांबवायला लावली. त्यानंतर आरोपींनी तोमर यांच्या डोळ्यात मिरची स्प्रे मारून हात-पाय दोरीने बांधले तसेच चाकू व पिस्टलचा धाक दाखवून त्यांच्याकडील ५,००० रुपये रोख हिसकावले व कार पळवण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, नरडाणा पोलीसांनी तात्काळ शोधमोहीम राबवून रेस्टहाऊस मागील शेतातून दोन संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे गजानन शिवकुमार शर्मा (वय २८, रा. ठाणे) व अभिनव शर्मा (वय १९, रा. उत्तर प्रदेश) अशी असून तिसरा आरोपी अद्याप फरार आहे.पोलीसांनी आरोपींकडून ५,००० रुपये रोख, एक नकली पिस्टल, चाकू, मिरची स्प्रे, दोरी व मोबाईल फोन असा एकूण सुमारे १५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई

ही उल्लेखनीय कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या कारवाईत नरडाणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, प्रेपोउनि अजय सोनवणे, तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश गिते, ललित पाटील, राकेश शिरसाठ, नारायण गवळी, चंद्रकांत साळुंके, रविंद्र मोराणीस, गणेश पाटील, धनेश कुंकारी, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पाटील, अर्पण मोरे, विजय माळी, दिपक भामरे, विनोद कोळी, सचिन बागुल, अनिल सोनवणे, पंकज भोई, चापोहेका सुनील पगारे, भरत भगरे, होमगार्ड जितेंद्र रणदिवे व पोलीस स्टेशन स्विपर आसीफ शहा यांनी सहभाग घेत ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पहिल्या सीबीएसई इयत्ता दहावीच्या दुहेरी परीक्षेत, उत्तीर्णतेचा दर 93.7% पर्यंत वाढला; पुण्याच्या विद्यार्थ्यांनी जोरदार...

पुणे/मुंबई: बुधवारी जाहीर झालेल्या CBSE इयत्ता दहावीच्या निकालांमध्ये राष्ट्रीय उत्तीर्णतेच्या टक्केवारीत किरकोळ वाढ होऊन 93.7% झाली, परंतु पुणे विभागाची भक्कम कामगिरी आणि...

पुण्यातील छेडछाडीच्या आरोपांवर इन्फोसिसचे निवेदन; नाशिक टीसीएस प्रकरणानंतर छाननीत वाढ

पुणे: आयटी क्षेत्रातील प्रमुख इन्फोसिसने बुधवारी त्यांच्या पुण्यातील बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट (बीपीएम) सुविधेवर कामाच्या ठिकाणी छळवणूक केल्याच्या सोशल मीडियाच्या आरोपांना औपचारिक प्रतिसाद...

सीएम रिलीफ फंडासाठीचा अर्ज लवकरच 8 तासांत मंजूर केला जाईल

पुणे: अर्ज सादर केल्यापासून आठ तासांच्या आत अर्ज मंजूर केले जातील आणि ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी लवकरच नवीन ऑनलाइन प्रणाली सुरू केली जाईल या...

पुण्यातील RMCs ऑपरेशनला विराम देतात, नियमांची स्पष्टता, एकसमान अंमलबजावणी शोधतात

पुणे: शहरातील रेडी मिक्स काँक्रिट ऑपरेटर्सनी संबंधित सर्व प्राधिकरणांनी एकत्रित मार्गदर्शक तत्त्वे तयार करेपर्यंत उत्पादन थांबवले आहे, तरीही नागरी संस्थेने वनस्पतींवर कारवाई...

PCMC कर्मचाऱ्यांसाठी दोन अतिरिक्त वेतनवाढीसाठी मराठीत एमए, कायदा समितीने प्रस्ताव मंजूर केला

पुणे: प्रशासनात प्रादेशिक भाषेचा वापर अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (PCMC) विधी समितीने मराठीत पदव्युत्तर (एमए) पदवी घेतलेल्या कर्मचाऱ्यांना दोन...

error: Content is protected !!