Homeक्राईमशिरपूर शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई : गावठी पिस्टलसह २ आरोपी जेरबंद

शिरपूर शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई : गावठी पिस्टलसह २ आरोपी जेरबंद

शिरपूर (धुळे) : शिरपूर शहर व परिसरात बेकायदेशीर शस्त्रांची खरेदी-विक्री रोखण्यासाठी शिरपूर शहर पोलिसांनी मोठी कामगिरी बजावत गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसांसह दोन संशयित आरोपींना जेरबंद केले आहे. ही कारवाई दि. ११ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास शिरपूर-शहादा रोडवरील शिंगावे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली. गुप्त माहितीवरून सापळा पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना गुप्त बातमी मिळाली होती की, दोन इसम गावठी पिस्टलची खरेदी-विक्री करण्यासाठी त्या परिसरात येणार आहेत. या माहितीची खात्री करून तात्काळ छापा टाकण्यासाठी पोउनि संदिप दरवडे व त्यांच्या पथकाला आदेश देण्यात आले.

पोलीस पथकाने पंचांसह ठिकाणी सापळा रचला. दरम्यान, दोन संशयित इसम एकमेकांशी देवाण-घेवाण करत असल्याचे दिसून आले. संशय बळावल्याने दुपारी २.१० वाजता छापा टाकून दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले.आरोपींची ओळख पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :पवन दादा कोतवाल (वय १९)रा. काळेपडळ, हडपसर, पुणे अक्षय संदिप पाटील (वय २१)रा. भटाणे, ता. शिरपूर, जि. धुळे जप्तीची माहिती तपासादरम्यान पवन कोतवाल याच्या अंगझडतीत पुढील साहित्य आढळले : एक गावठी बनावटीचे स्टीलचे पिस्टल (काळ्या फायबर मुठीसह)किंमत : ₹२५,०००/-दोन जिवंत काडतुसे किंमत : ₹२,०००/- एकूण जप्त माल : ₹२७,०००/-तसेच आरोपींकडून मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आले आहेत.

गुन्हा दाखल या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात विविध गुन्हा दाखल दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.सदरची कामगिरी यांनी केली मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे तसेच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. किशोरकुमार परदेशी तसेच पोउनि संदिप दरवडे यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकातील पोहेकॉ रविंद्र आखडमल, पोहेकॉ अतुल पाटील, पोकों आरीफ तडवी, योगेश दाभाडे, मनोज महाजन, सोमा ठाकरे, विनोद आखडमल, सचिन वाघ, भटू साळुंके, मनोज दाभाडे, प्रशांत पवार, गोविंद कोळी तसेच चापोकों रविंद्र महाले व विजय पाटील यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हैदराबाद मॉडेलवर अवलंबून राहण्यासाठी ओव्हरहेड केबल्सबाबत पीएमसीचे येऊ घातलेले धोरण

पुणे: शहरातील गोंधळलेल्या केबल नेटवर्कचे नियमन करण्यासाठी नागरी प्रशासनाने मंगळवारी मानक कार्यप्रणाली (SOP) तयार करण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की नागरी संस्थेने हैदराबादचे मॉडेल...

नळांमधून गढूळ, दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने जनवादी जनता वसाहत रहिवाशांचा निषेध, प्रदूषण दूर करण्यासाठी...

पुणे: जनवादी जनता वसाहत आणि परिसरात संताप आणि चिंतेचे वातावरण पसरले असून, गेल्या अनेक दिवसांपासून गढूळ, विरंगुळ्याचे पाणी येत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली असून,...

ट्रीटमेंट प्लांटमधील देखभाल दुरुस्तीसाठी गुरुवारी पाणीकपात करण्यात आली

पुणे: पुणे महापालिकेने पर्वती, वडगाव, लष्कर, वारजे आणि भामा आसखेडसह प्रमुख जलशुद्धीकरण केंद्रांवर तातडीने विद्युत, पंपिंग आणि नागरी देखभाल करण्यासाठी गुरुवारी पाणीकपात जाहीर केली...

11 कोटी रुपयांच्या ऑनलाइन शेअर फसवणूक प्रकरणात पोलिसांनी 9 जणांविरुद्ध MCOCA सुरू केली

पुणे : ऑनलाइन शेअर फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आलेल्या नऊ जणांवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी प्रथमच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लावला.आरोपी हे एका...

चुलत भावाच्या हत्येप्रकरणी शिरूर येथील कामगाराला जन्मठेपेची शिक्षा

पुणे : शिरूर येथे लहान मुलांमध्ये झालेल्या भांडणातून 5 फेब्रुवारी 2021 रोजी चुलत भाऊ सुभाष बी सोनवणे (55) याचा खून केल्याप्रकरणी शिरूर येथील सत्र...

error: Content is protected !!