शिरपूर | प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर मोठी कारवाई करत महाराष्ट्र शासनाचा कर बुडवून विक्रीसाठी आणली जात असलेली तब्बल ₹४४ लाख ६३ हजार ८०० किमतीची विदेशी दारू आणि कंटेनर जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू तस्करांचे धाबे दणाणले असून जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.दि. ०७ मे २०२६ रोजी रात्री पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गोपनीय माहिती मिळाली की, सेंधवा (मध्यप्रदेश) मार्गे धुळे दिशेने जाणाऱ्या RJ 32 GB 4036 या कंटेनरमधून मोठ्या प्रमाणात अवैध दारू वाहतूक होत आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी हाडाखेड चेकपोस्ट येथे सापळा रचला.रात्री उशिरा संशयित कंटेनर अडवून चालक सतिषकुमार पुडाराम जाट (रा. हरियाणा) याची चौकशी करण्यात आली. मात्र चालकाने मालाबाबत समाधानकारक माहिती दिली नाही. त्यामुळे वाहन पोलीस ठाण्यात आणून सकाळी पंचांसमक्ष कंटेनरची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान कंटेनरमध्ये “ऑल सिझन्स”, “अंकल टॉम” आणि “रॉयल चॅलेंज” कंपनीच्या देशी-विदेशी दारूचे मोठ्या प्रमाणात खोके आढळून आले. विशेष म्हणजे बाटल्यांवर “Only Sale For Union Territory Chandigarh” असे लेबल असल्याने महाराष्ट्रात बेकायदेशीर विक्रीसाठी हा साठा आणण्यात आल्याचे स्पष्ट झाले. जप्त मुद्देमालात समावेश:▪️ ऑल सिझन्स – १८० मिलीचे १६० खोके▪️ ऑल सिझन्स – ७५० मिलीचे ५० खोके▪️ अंकल टॉम – ७५० मिलीचे ४९ खोके▪️ अंकल टॉम – १८० मिलीचे १०० खोके▪️ रॉयल चॅलेंज – १८० मिलीचे ०७ खोके▪️ टाटा कंटेनर RJ 32 GB 4036 एकूण मुद्देमाल किंमत : ₹४४,६३,८००/-याप्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात विविध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोसई मनोज कचरे करीत आहेत
.सदर कारवाई यांनी केली मा. श्री. विशाल आनंद (पोलीस अधीक्षक, धुळे), श्री. अजय देवरे (अपर पोलीस अधीक्षक, धुळे) तसेच श्री. विश्वजोत जाधव (उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरपूर उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.या कारवाईत शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नेतृत्वाखाली पोसई मनोज कचरे, संतोष पाटील, संदीप ठाकरे, योगेश मोरे, विजय दिवरे, स्वप्निल बांगर, सुनील पवार, अल्ताफ मिर्झा तसेच गुरुदास बडगुजर यांनी विशेष मेहनत घेत यशस्वी कारवाई केली.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















