शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने फक्त २४ तासांत चोरीस गेलेली 50 हजार किंमतीची दुचाकी जप्त करत एक सराईत गुन्हेगार जेरबंद केला. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलिंग करत असताना ही यशस्वी कारवाई करण्यात आली.फिर्यादी मनोहर दत्तात्रय कोळी (वय ३०, रा. अर्थ खु., ता. शिरपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक ०७ जून २०२५ रोजी दुपारी ३.३० ते ४.४५ दरम्यान त्यांनी आपली होंडा सी.बी. शाईन (क्र. MH18/BB5526) दुचाकी गुजराथी कॉम्प्लेक्ससमोर रस्त्याच्या कडेला हँडल लॉक करून उभी केली होती. यावेळी अज्ञात चोरट्याने ती चोरी केली. या घटनेवरून शिरपूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३०४/२०२५, भा.दं.वि. कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने तपासाची चक्रे फिरवली. दिनांक ०८ जून २०२५ रोजी ईदनिमित्त पेट्रोलिंग करत असताना संशयास्पदरीत्या एक व्यक्ती रिक्रिएशन गार्डनसमोर काळ्या रंगाच्या क्रमांक नसलेल्या दुचाकीवर फिरताना दिसला. थांबवून चौकशी केली असता त्याचे नाव अर्शद शेख हनीफ शेख (वय २४, रा. लाला सरदार नगर, देवपूर, जि. धुळे) असे असल्याचे समोर आले.त्याच्याकडे दुचाकीबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्यास पोलिस ठाण्यात आणण्यात आले. दुचाकीचा चेसिस व इंजिन नंबर तपासून हीच गाडी चोरीस गेलेली असल्याची खात्री पटली. पुढील चौकशीत अर्शद शेख याने गाडी गुजराथी कॉम्प्लेक्स येथून चोरी केल्याची कबुली दिली.सदर आरोपीवर यापूर्वी देवपूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे २, साध्या चोरीचे १, घरफोडीचे २, व मारहाणीचा १ असे एकूण ६ गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे.या प्रकरणात फक्त २४ तासांत आरोपीला अटक करून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करणं ही शिरपूर पोलिसांसाठी उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. आरोपीस दि. १० जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र रोकडे करीत आहेत.ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे, व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी व डी.बी. पथकाने केली. या पथकात पोहेकॉ राजेंद्र रोकडे, रविंद्र आखडमल, पो.कॉ. विनोद आखडमल, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, भटू साळुंके, प्रशांत पवार, मनोज महाजन, मनोज दाभाडे, सचिन वाघ, आरिफ तडवी, सोमा ठाकरे, उमेश पवार, होमगार्ड मिथुन पवार, राम भिल, व सुनिल पावरा यांचा सहभाग होता.
O

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















