Homeताज्या बातम्याशिरपूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी – चोरी गेलेली ₹५० हजाराची किंमतीची दुचाकी जप्त;...

शिरपूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी – चोरी गेलेली ₹५० हजाराची किंमतीची दुचाकी जप्त; सराईत आरोपी जेरबंद

शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने फक्त २४ तासांत चोरीस गेलेली 50 हजार  किंमतीची दुचाकी जप्त करत एक सराईत गुन्हेगार जेरबंद केला. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलिंग करत असताना ही यशस्वी कारवाई करण्यात आली.फिर्यादी मनोहर दत्तात्रय कोळी (वय ३०, रा. अर्थ खु., ता. शिरपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक ०७ जून २०२५ रोजी दुपारी ३.३० ते ४.४५ दरम्यान त्यांनी आपली होंडा सी.बी. शाईन (क्र. MH18/BB5526) दुचाकी गुजराथी कॉम्प्लेक्ससमोर रस्त्याच्या कडेला हँडल लॉक करून उभी केली होती. यावेळी अज्ञात चोरट्याने ती चोरी केली. या घटनेवरून शिरपूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३०४/२०२५, भा.दं.वि. कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने तपासाची चक्रे फिरवली. दिनांक ०८ जून २०२५ रोजी ईदनिमित्त पेट्रोलिंग करत असताना संशयास्पदरीत्या एक व्यक्ती रिक्रिएशन गार्डनसमोर काळ्या रंगाच्या क्रमांक नसलेल्या दुचाकीवर फिरताना दिसला. थांबवून चौकशी केली असता त्याचे नाव अर्शद शेख हनीफ शेख (वय २४, रा. लाला सरदार नगर, देवपूर, जि. धुळे) असे असल्याचे समोर आले.त्याच्याकडे दुचाकीबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्यास पोलिस ठाण्यात आणण्यात आले. दुचाकीचा चेसिस व इंजिन नंबर तपासून हीच गाडी चोरीस गेलेली असल्याची खात्री पटली. पुढील चौकशीत अर्शद शेख याने गाडी गुजराथी कॉम्प्लेक्स येथून चोरी केल्याची कबुली दिली.सदर आरोपीवर यापूर्वी देवपूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे २, साध्या चोरीचे १, घरफोडीचे २, व मारहाणीचा १ असे एकूण ६ गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे.या प्रकरणात फक्त २४ तासांत आरोपीला अटक करून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करणं ही शिरपूर पोलिसांसाठी उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. आरोपीस दि. १० जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र रोकडे करीत आहेत.ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे, व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी व डी.बी. पथकाने केली. या पथकात पोहेकॉ राजेंद्र रोकडे, रविंद्र आखडमल, पो.कॉ. विनोद आखडमल, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, भटू साळुंके, प्रशांत पवार, मनोज महाजन, मनोज दाभाडे, सचिन वाघ, आरिफ तडवी, सोमा ठाकरे, उमेश पवार, होमगार्ड मिथुन पवार, राम भिल, व सुनिल पावरा यांचा सहभाग होता.

O

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 25 एप्रिल रोजी...

  शिरपूर : एस.व्ही.के.एम. संचालित तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलचे उदघाटन मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 25 एप्रिल 2026 रोजी करण्यात येत आहे. श्री विलेपार्ले...

एअरपोर्ट रनवे बंद झाल्यानंतर पुन्हा वेळापत्रक, परतावा मिळवण्यासाठी प्रवासी धावपळ करतात

पुणे: शुक्रवारी रात्री सुखोई ३० एमकेआय फायटर जेटच्या हार्ड लँडिंगमुळे 99 उड्डाणे रद्द करणे आणि 12 येणारी विमाने पुणे विमानतळावर वळवणे यामुळे हजारो प्रवासी...

झेडपी शाळेच्या बांधकामाच्या ठिकाणी 12 वर्षांचा मुलगा काम करताना आढळला

पुणे: शिरूर तालुक्यातील वाडेगाव येथील जिल्हा परिषद (जि.प.) शाळेतील शौचालय आणि शौचालयाच्या बांधकामात गुंतलेल्या १२ वर्षीय मुलाची शुक्रवारी दुपारी लोणी कंद पोलिसांनी...

IAF लढाऊ विमानाच्या ‘हार्ड लँडिंग’मुळे पुण्याची धावपट्टी बंद, रात्रीच्या उड्डाणांवर परिणाम

पुणे: भारतीय हवाई दलाच्या (IAF) विमानाचा समावेश असलेल्या एका घटनेनंतर त्याची धावपट्टी लँडिंग आणि टेक-ऑफसाठी बंद करण्यात आल्याने शुक्रवारी रात्री 11 च्या...

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू अहवाल प्रकरणाच्या सुरू असलेल्या तपासात महा सीआयडीमध्ये कर्नाटक पोलिसांच्या...

पुणे: राष्ट्रवादीचे (एसपी) आमदार रोहित पवार यांनी शनिवारी सांगितले की, कर्नाटक पोलिसांनी त्यांचे काका अजित पवार यांच्या विमान अपघातात मृत्यूप्रकरणी नोंदवलेला एफआयआर...

error: Content is protected !!