शिरपुर होळनांथे गावात सिध्दीविनायक कॉलनी परिसरात अवैध देशी दारू विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती थाळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि.) श्री. शत्रुघ्न पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश देत पोलीस पथक रवाना केले.रोजी दुपारी सुमारे १ वाजता, पोहेकॉ. भुषण चौधरी यांनी पोकॉ. किरण सोनवणे, पोकॉ. धनराज मालचे, पोकॉ. मुकेश पावरा सिध्दीविनायक कॉलनीत पाहणीदरम्यान एक इसम घराच्या मागील बाजूस संशयास्पद हालचाली करताना दिसून आला. त्यास थांबवून चौकशी केली असता त्याने आपले नाव पंढरीनाथ संपत भोई (वय ५१ वर्षे, रा. सिध्दीविनायक कॉलनी, होळनांथे) असे सांगितले.त्याच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आला:१६ खोके टँगो पंच देशी दारू (प्रत्येकात ४८ बाटल्या) – एकूण किंमत ₹५३,७६०/-८ खोके पॉवरकुल बिअर टिन (प्रत्येकात २४ नग) – एकूण किंमत ₹१९,२००/-एकूण जप्त मुद्देमालाची अंदाजित किंमत ₹७२,९६०/- एवढी आहे. आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध प्रोव्हिबिशन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोहेकॉ. भुषण चौधरी हे करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक मा. अजय देवरे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर मा. सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सपोनि. शत्रुघ्न पाटील, पोसई समाधान भाटेवाल, पोहेकॉ. भुषण चौधरी, पोकॉ. किरण सोनवणे, पोकॉ. धनराज मालचे, पोकॉ. मुकेश पावरा व चापोकॉ. दिलीप मोरे यांनी सहभाग घेतला.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















