शिरपूर, शेतकरी आणि दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू भाऊ कडू हे गेल्या सहा दिवसांपासून अन्नत्याग आंदोलनावर बसले आहेत. मात्र, अद्यापही राज्य सरकारकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नाही, ही बाब अत्यंत खेदजनक असल्याचे संतप्त सूर आता उमटू लागले आहेत.
राज्य सरकारला जाग यावी, यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने येत्या सोमवार, दिनांक १६ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता शिरपूर तहसील कार्यालयासमोर सुतळी बॉम्ब फोडो आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाद्वारे सरकारच्या निद्रिस्त यंत्रणेला जागे करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
या आंदोलनाला शिरपूर तालुक्यातील तसेच परिसरातील सर्व शेतकरी बांधव, दिव्यांग बांधव आणि बच्चू भाऊंच्या विचारांशी निष्ठा बाळगणारे सर्व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे शिरपूर तालुका अध्यक्ष ईश्वर आर. बोरसे यांनी केले आहे

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















