Homeक्राईमधुळे जिल्ह्यात आजवरचे सर्वात मोठे ‘ऑपरेशन ऑल आऊट’; शस्त्रसाठा, मोटारसायकलीसह, आरोपी जेरबंद!

धुळे जिल्ह्यात आजवरचे सर्वात मोठे ‘ऑपरेशन ऑल आऊट’; शस्त्रसाठा, मोटारसायकलीसह, आरोपी जेरबंद!

शिरपुर आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी धुळे जिल्हा पोलीस दलाने दिनांक १९ जुलै २०२५ रोजी संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबवले. या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा, संशयित व्यक्ती, वाहने आणि अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई जिल्ह्यातील आजवरची सर्वात मोठी आणि व्यापक मोहीम ठरली आहे.

पोलीस अधीक्षक मा. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे यांच्या देखरेखीखाली हे ऑपरेशन ऑल आउट राबवण्यात आले. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर पोलीस स्टेशन, वाहतूक शाखा, उपविभागीय अधिकारी यांना यात सहभागी करून घेण्यात आले.

महत्त्वाची कारवाई:

०३ पिस्तुल मॅगझीनसह

०४ जिवंत काडतुसे

०७ धारदार तलवारी

०५ मोटारसायकली

०२ जलपरी (पाण्याच्या मोटारी)

तडीपार, फरार व पाहिजे आरोपी अटकेत

हातभट्टी दारू, जुगार व अवैध धंद्यांवर धाडसी कारवाई

वाहतूक शाखेची विशेष कामगिरी:

०७ ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रकरणे

एकूण ३३० वाहतूक गुन्हे नोंद

₹१६,९००/- इतका दंड वसूल

ट्रिपल सिटिंग, सीट बेल्ट न वापरणे, बिनपरवाना वाहन चालवणे, रिफ्लेक्टर नसणे यासारख्या नियमभंगावर भर

इतर महत्त्वपूर्ण तपासण्या:

फरार व पाहिजे आरोपींवर शोधमोहीम

सराईत गुन्हेगार, हिस्ट्रीशीटर यांची चौकशी

हॉटेल, लॉज, ओयो रूम्स, धाबे यांची तपासणी

दुचाकी व चारचाकी वाहनांची कसून तपासणी

वॉरंट बजावणी व अवैध दारू विक्रीवर छापे

पोलीस अधीक्षकांचा इशारा:

“पोलीस हे कायद्याच्या चौकटीत राहून अतिशय मेहनतीने आपले कर्तव्य बजावत आहेत. अशा प्रकारची ऑपरेशन ऑल भविष्यातही सातत्याने राबवली जातील. गुन्हेगारीचा बीमोड करणे हे आमचे सर्वोच्च उद्दिष्ट आहे,” असे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग फसवणूकीमुळे 66 वर्षीय वृद्धाने रु.1 कोटी गमावले

पुणे: सायबर चोरांनी साळुंके विहार येथील सेवानिवृत्त अभियंता (६६) यांना गेल्या वर्षी डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान शेअर-ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आश्वासन देऊन एक कोटी...

पूर्वीचा तोटा भरून काढण्यासाठी माणूस दुसऱ्या ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग घोटाळ्यात पडला, 66L रुपये गमावले

पुणे: शेअर-ट्रेडिंग घोटाळ्यातील नुकसान भरून काढण्यासाठी महागड्या बोलीमध्ये, एका खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्याने (57) पुन्हा दुसऱ्या कथित जागतिक गुंतवणूक व्यासपीठाचा बळी घेतला आणि गेल्या वर्षी...

विदर्भ राष्ट्रीय टोकाच्या जवळ आहे, पुण्यात कमाल तापमानात किंचित घट झाली आहे

पुणे: महाराष्ट्राचा मोठा भाग — विशेषतः विदर्भ — तीव्र उष्णतेच्या सावटाखाली आहे, अमरावतीमध्ये ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, उत्तर प्रदेशातील बांदा येथे...

पिंपरी चिंचवडमध्ये मंगळवारी संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नसल्याने महापालिकेने देखभाल दुरुस्तीची कामे केली आहेत

पुणे: निगडी जलशुद्धीकरण केंद्रातील अत्यावश्यक नागरी आणि विद्युत देखभाल सुविधेसाठी पिंपरी चिंचवडमधील पाणीपुरवठा मंगळवारी संध्याकाळी बंद ठेवण्यात येणार आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC)...

पुण्यात मंगळवारी वंदे भारत एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला

पुणे: सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस सोमवारी संध्याकाळी रुळावरून घसरल्याने मंगळवारी पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आणि पुणे-मुंबई दरम्यानच्या शहरांतर्गत...

error: Content is protected !!