शिरपूर (ता. धुळे) येथे घडलेल्या एका धाडसी घटनेत, पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी आणि त्यांच्या पथकाने तापी नदी पुलावर आत्महत्या करण्यासाठी आलेल्या तरुणाचा जीव वाचवला.
नैराश्यातून त्रस्त झालेला तरुण पुलावर आला होता. त्याने आत्महत्या करण्याचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर टाकत मित्रांना संदेशही पाठवला होता. ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक किशोर परदेशी साहेब यांनी तात्काळ आपल्या पथकाला सतर्क केले.पो कॉप्रमोद ईशी, पो भटू साळुंखे आणि गावातील रहिवासी अशोक कोळी यांनी क्षणाचाही विलंब न करता पुलावर धावत जाऊन तरुणाला पकडले. त्यानंतर तपासात समजले की त्याचा परिवार आर्थिक संकटात आहे; आई कचरा व भंगार वेचून उदरनिर्वाह करते.
पोलिस निरीक्षक किशोर परदेशी साहेब यांनी त्या तरुणाला समजावून घेतले, मानसिक आधार दिला आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला दिला. या कार्याबद्दल संपूर्ण शिरपूर तालुक्यात पोलिस पथकाचे कौतुक होत आहे.
पोलिसांची ही संवेदनशील व वेळेवरची कारवाई खाकी मागील माणुसकीचे जिवंत उदाहरण ठरली आहे.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















