Homeक्राईमशिरपूरमध्ये आंदोलनादरम्यान पोलीस निरीक्षकावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला

शिरपूरमध्ये आंदोलनादरम्यान पोलीस निरीक्षकावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला

शिरपूर (ता. धुळे) – शिरपूर शहरात अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चानंतर रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण लागले. या गोंधळात शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे.

सांगवी पोलीस ठाण्यात आठ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आदिवासी संघटनांनी सोमवार (दि. १८) रोजी शिरपूर शहरात मूक मोर्चा काढला. मोर्चाच्या अखेरीस उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांना निवेदन देऊन आरोपीवर कठोर शासन करण्याची आणि खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी करण्यात आली. हा मोर्चा शांततेत पार पडला.

मात्र काही वेळानंतर शिरपूर येथील गुजराती कॉम्प्लेक्ससमोर काही तरुणांनी अचानक रास्ता रोको केला. त्यामुळे मोठी गर्दी जमून वाहतूक ठप्प झाली. माहिती मिळताच निरीक्षक हिरे घटनास्थळी दाखल झाले आणि आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काही आंदोलक आक्रमक झाले. पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी सौम्य बळाचा वापर केला.

दरम्यान गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने हिरे यांच्या पाठीमागून तीक्ष्ण हत्याराने वार केला. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले आहे.

रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांनी आरोपीला ताब्यात द्यावा आणि तत्काळ फाशी द्यावी अशा बेकायदेशीर मागण्या केल्या. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत असून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बिशप स्कूलने 15 एप्रिल रोजी उंड्री कॅम्पसमध्ये आंदोलकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली

पुणे: बिशप एज्युकेशन सोसायटीने शुक्रवारी पालकांना एक परिपत्रक जारी केले आणि 15 एप्रिल रोजी शुल्काच्या निषेधाच्या अंतर्गत चौकशीनंतर उंड्री कॅम्पसमध्ये कथित घुसखोरी, व्यत्यय आणि...

IAF जेटच्या ‘हार्ड लँडिंग’ घटनेनंतर पुणे विमानतळ पुन्हा सुरू झाले

पुणे: भारतीय हवाई दलाच्या विमानाचा समावेश असलेल्या घटनेमुळे काही तासांच्या व्यत्ययानंतर, शनिवारी सकाळी पुणे विमानतळावरील कामकाज पुन्हा सुरू झाले, अधिकाऱ्यांनी धावपट्टी पूर्ववत...

निष्काळजीपणामुळे बाळाच्या मृत्यूप्रकरणी 4 डॉक्टर, 2 परिचारिकांवर एफआयआर

पुणे : गेल्या वर्षी अकरा महिन्यांच्या बालिकेच्या मृत्यूप्रकरणी निष्काळजीपणा आणि फसवणूक करून मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी नवी पेठेतील चिन्मय नर्सिंग होमच्या चार बालरोगतज्ज्ञ आणि दोन...

मर्यादित पुरवठ्यावर कार्यालयाचे भाडे स्थिर आहे

पुणे: शहरातील व्यावसायिक जागांसाठी भाडेतत्त्वावरील भाडे स्थिर राहिल्याने विकासकांनी कार्यालयीन शोषण कमी होण्याची चिन्हे दाखवूनही नवीन पुरवठा प्रतिबंधित करणे सुरू ठेवले आहे.नाइट...

मद्यधुंद प्रवाशाने तिच्यावर हल्ला केल्याने कंडक्टर जखमी झाला

पुणे : पीएमपीएमएल बस कंडक्टर सुरेखा बळीराम भालेराव यांच्या पायाला दुखापत झाली असून दारूच्या नशेत असलेल्या एका प्रवाशाने बुधवारी सायंकाळी 7.30 च्या...

error: Content is protected !!