Homeक्राईमसाधूचा वेष धारण करून महामार्ग रस्त्यावर लूटमार करणारे दरोडेखोर जेरबंद

साधूचा वेष धारण करून महामार्ग रस्त्यावर लूटमार करणारे दरोडेखोर जेरबंद

धुळे,  साधूचा वेष परिधान करून रस्त्यावर प्रवाशांना फसवून सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश धुळे जिल्हा पोलिसांनी केला आहे. मोहाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने अवघ्या काही दिवसांत या टोळीला जेरबंद केले असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
घटनेचा तपशील
दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी फिर्यादी ललिता नरेंद्र पाटील (वय 38, रा. खाचणे, ता. चोपडा, जि. जळगाव) आपल्या नातलगांसह पंढरपूर, तुळजापूर व जेजुरी येथे देवदर्शन करून परत येत होत्या. क्रूझर गाडी (क्र. MH 18 AJ 9563)ने मालेगावहून धुळ्याकडे परतताना दुपारी अंदाजे २.३० वाजता लळींग घाट परिसरात ही घटना घडली.
गाडीसमोर साधूसारखा वेश केलेला इसम उभा ठाकला. “मुझे पिनेके लिये पाणी दो और गाडीसे उतरकर मेरा आशिर्वाद लो,” असे सांगत त्याने सर्व प्रवाशांना गाडीतून उतरवले. प्रवाशांनी त्याचा साधूप्रमाणे सन्मान करून पाय धरले. मात्र थोड्याच वेळात त्याने आपल्या कमरेतला चाकू बाहेर काढला व “आप के पास का सोना जल्दी निकालके दो, नहीं तो जान से मार दूंगा” अशी धमकी देत प्रवाशांना धाक दाखवला.
प्रवाशांच्या जिवाला धोका होईल या भीतीपोटी फिर्यादीच्या आई सुनंदाबाई व चुलत सासू सरलाबाई यांच्याकडील दागिने हिसकावून नेले.
लुटलेले दागिने
07 ग्रॅम सोन्याची मणी व रामपानाची माळ (किंमत अंदाजे ₹49,000)
03 ग्रॅम सोन्याचे कानातील टॅप्सी (किंमत अंदाजे ₹21,000)
05 ग्रॅम सोन्याची मणीमाळ (किंमत अंदाजे ₹35,000)
एकूण किंमत – ₹1,05,000
या घटनेनंतर ललिता पाटील यांनी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा रजि. क्रमांक 237/2025 BNS कलम 310(2) अंतर्गत दिनांक 24 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांची धडाकेबाज कारवाई
गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलिसांनी विशेष शोध पथक तयार केले.
आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता गरताडबारी परिसरात संशयित इसम साधूच्या वेशात पायी जाताना पोलिसांना दिसला. त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव जागीरनाथ बाबुनाथ नाथसफेरे (वय 23, रा. घेसुपुरा सफेरा बस्ती, ता. रोशनाबाद, जि. हरिद्वार, उत्तराखंड) असे सांगितले.
चौकशीत त्याने कबुली दिली की तो व त्याचे साथीदार मिळून साधूचा वेष करून प्रवाशांची लूटमार करतात. त्याने इतर साथीदारांची नावेही सांगितली.
आरोपींची नावे
जागीरनाथ बाबुनाथ नाथसफेरे (23)
गोविंदनाथ कल्लूनाथ नाथसफेरे (35)
सौदागर बाबुनाथ नाथसफेरे (25)
विक्की मोसमनाथ नाथसफेरे (23)
क्रांता मोसमनाथ नाथसफेरे (25) (सर्व रा. घेसुपुरा सफेरा बस्ती, ता. रोशनाबाद, जि. हरिद्वार, उत्तराखंड)
पोलिसांची कामगिरी
ही कारवाई मोहाडी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी शिल्पा गोपीचंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोसई मोहन पाटील, पोहेकॉ पंकज चव्हाण, पोकॉ मुकेश मोरे, प्रकाश जाधव, रमेश शिंदे व मनिष सोनगिरे यांचा समावेश होता.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील करीत आहेत.

👉 साधूसदृश वेशाचा गैरफायदा घेऊन प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश झाल्याने नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे. पोलीस प्रशासनाने दिलेल्या आवाहनानुसार प्रवासादरम्यान अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बिशप स्कूलने 15 एप्रिल रोजी उंड्री कॅम्पसमध्ये आंदोलकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली

पुणे: बिशप एज्युकेशन सोसायटीने शुक्रवारी पालकांना एक परिपत्रक जारी केले आणि 15 एप्रिल रोजी शुल्काच्या निषेधाच्या अंतर्गत चौकशीनंतर उंड्री कॅम्पसमध्ये कथित घुसखोरी, व्यत्यय आणि...

IAF जेटच्या ‘हार्ड लँडिंग’ घटनेनंतर पुणे विमानतळ पुन्हा सुरू झाले

पुणे: भारतीय हवाई दलाच्या विमानाचा समावेश असलेल्या घटनेमुळे काही तासांच्या व्यत्ययानंतर, शनिवारी सकाळी पुणे विमानतळावरील कामकाज पुन्हा सुरू झाले, अधिकाऱ्यांनी धावपट्टी पूर्ववत...

निष्काळजीपणामुळे बाळाच्या मृत्यूप्रकरणी 4 डॉक्टर, 2 परिचारिकांवर एफआयआर

पुणे : गेल्या वर्षी अकरा महिन्यांच्या बालिकेच्या मृत्यूप्रकरणी निष्काळजीपणा आणि फसवणूक करून मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी नवी पेठेतील चिन्मय नर्सिंग होमच्या चार बालरोगतज्ज्ञ आणि दोन...

मर्यादित पुरवठ्यावर कार्यालयाचे भाडे स्थिर आहे

पुणे: शहरातील व्यावसायिक जागांसाठी भाडेतत्त्वावरील भाडे स्थिर राहिल्याने विकासकांनी कार्यालयीन शोषण कमी होण्याची चिन्हे दाखवूनही नवीन पुरवठा प्रतिबंधित करणे सुरू ठेवले आहे.नाइट...

मद्यधुंद प्रवाशाने तिच्यावर हल्ला केल्याने कंडक्टर जखमी झाला

पुणे : पीएमपीएमएल बस कंडक्टर सुरेखा बळीराम भालेराव यांच्या पायाला दुखापत झाली असून दारूच्या नशेत असलेल्या एका प्रवाशाने बुधवारी सायंकाळी 7.30 च्या...

error: Content is protected !!