Homeक्राईमधुळ्यात बनावट दारू निर्मिती कारखान्यावर गुन्हे अन्वेषण विभागाचा छापा

धुळ्यात बनावट दारू निर्मिती कारखान्यावर गुन्हे अन्वेषण विभागाचा छापा

धुळे शहरातील शासकीय दूध डेअरी परिसरात बनावट देशी-विदेशी दारू तयार करण्याचा कारखाना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने उध्वस्त केला. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर दारू निर्मितीसाठी लागणारे रसायन, स्पिरिट, बाटल्या, बुच लावण्याचे मशीन व इतर साहित्य जप्त करण्यात आले असून, एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे जिल्ह्यात आगामी सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू व अमली पदार्थ तस्करीविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी स्वतंत्र पथके नियुक्त केली.

दरम्यान, पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना शासकीय दूध डेअरी परिसरात बनावट दारू तयार होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी पोउनि अमित माळी, पोलीस अंमलदार मच्छिद्र पाटील, हेमंत बोरसे, प्रल्हाद वाघ, योगेश चव्हाण, हेकॉ. शिला सुर्यवंशी व हर्षल चौधरी या पथकासह छापा टाकला.

या कारवाईत सहजीवन नगरातील गणेश नारायण निकम यांच्या ताब्यातील घरामध्ये बनावट दारू तयार करण्याचा कारखाना आढळून आला. घटनास्थळावरून पोलिसांनी स्पिरिट, बाटल्यांना बुच लावण्यासाठीचे मशीन, रिकाम्या बाटल्या, बूच, स्टिकर्स व इतर साहित्य असा एकूण ₹१,६८,०९०/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

गणेश नारायण निकम याच्याविरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देखील या आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हे नोंद असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. सहजीवन नगरातून तयार होणारी ही बनावट दारू नेमकी कोणत्या तस्कराला किंवा गटाला पुरवली जात होती, याबाबतचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

2019 मध्ये शासकीय कार्यालयात महसूल अधिकाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी शेतकऱ्याला 2 वर्षांची शिक्षा; जामीन मंजूर...

पुणे : बारामती येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश हितेंद्र वाणी यांच्या न्यायालयाने 14 ऑगस्ट 2019 रोजी फेरफार नोंदीच्या वादातून पाटस येथील शासकीय कार्यालयात महसूल मंडळ...

टँकरचालकांनी केली दरवाढ, पाणीपट्टी भरूनही पीएमसीच्या अकार्यक्षम पुरवठ्यावर रहिवाशांची टीका

पुणे: उंड्री, महंमदवाडी आणि एनआयबीएम ऍनेक्सी येथील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवासी महापालिकेच्या पुरवठ्याचा एक थेंबही न मिळाल्याने पाणी कर भरत आहेत, तरीही खाजगी टँकर...

बिशप स्कूलने 15 एप्रिल रोजी उंड्री कॅम्पसमध्ये आंदोलकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली

पुणे: बिशप एज्युकेशन सोसायटीने शुक्रवारी पालकांना एक परिपत्रक जारी केले आणि 15 एप्रिल रोजी शुल्काच्या निषेधाच्या अंतर्गत चौकशीनंतर उंड्री कॅम्पसमध्ये कथित घुसखोरी, व्यत्यय आणि...

IAF जेटच्या ‘हार्ड लँडिंग’ घटनेनंतर पुणे विमानतळ पुन्हा सुरू झाले

पुणे: भारतीय हवाई दलाच्या विमानाचा समावेश असलेल्या घटनेमुळे काही तासांच्या व्यत्ययानंतर, शनिवारी सकाळी पुणे विमानतळावरील कामकाज पुन्हा सुरू झाले, अधिकाऱ्यांनी धावपट्टी पूर्ववत...

निष्काळजीपणामुळे बाळाच्या मृत्यूप्रकरणी 4 डॉक्टर, 2 परिचारिकांवर एफआयआर

पुणे : गेल्या वर्षी अकरा महिन्यांच्या बालिकेच्या मृत्यूप्रकरणी निष्काळजीपणा आणि फसवणूक करून मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी नवी पेठेतील चिन्मय नर्सिंग होमच्या चार बालरोगतज्ज्ञ आणि दोन...

error: Content is protected !!